Friday, August 20, 2010

सात

गुजरांच्या त्या पराक्रमी प्रसंगावर परत तशी उंची गाठणे केवळ अशक्य!
माझी देखील कित्येक दिवस हीच समजूत होती. पण परवा आमच्या वर्ध्याचेच कवी, साहित्यिक ’शिरीष गो. देशपांडे’ यांचे हे काव्य वाचण्यात आले. आता वाटते की "सात" न भूतो असेल, पण न भविष्यति खचितच नाही.

”धुमसत होते अंतर त्यातच ठिणगी पडली जशी
सुरुंग उडला जसा; निघाला सहा शिपायांनिशी
राव इरेचा असा; पेटता डोंबच त्याच्या मनी
कडकडत्या खड्गात नाचती तृषार्त सौदामिनी
सूर्यरथाचे अश्व निखळले आले पृथ्वीवरी
चौखुर उधळत, धरणी विंधत गेले वार्‍यावरी
शिवतेजाच्या प्रखर शलाका सरसरल्या सत्वरी
काळोखच्या छाताडावर थै थै नर्तन करी
सात सतींचे पुण्य आणखी सप्तर्षींचा धीर
वीर न वेडे पीर निघाले सात शिवाचे तीर....”

No comments:

Post a Comment